Men's Health Tips: पुरुषांच्या आरोग्यासाठी 'ही' आयुर्वेदिक वनस्पती आहे अत्यंत शक्तिशाली

पुढारी वृत्तसेवा

बाळाचे नियोजन करताना सर्व तयारी केवळ महिलांनीच करावी, असा समज अजूनही अनेकांमध्ये आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, गर्भधारणा यशस्वी होण्यासाठी पुरुषांनीही तितकीच जबाबदारी घ्यावी लागते.

शरीराची योग्य तयारी, संतुलित आहार आणि जीवनशैलीतील बदल हे पुरुषांसाठीही तितकेच महत्त्वाचे आहेत.

अनेकदा गर्भधारणेत येणाऱ्या अडचणींसाठी केवळ महिलांना दोष दिला जातो, परंतु पुरुषांमधील प्रजनन क्षमता कमी असणे हे देखील त्यामागील मुख्य कारण असू शकते.

अशा वेळी पुरुषांच्या आरोग्यासाठी आणि उत्तम 'स्पर्म क्वालिटी'साठी 'अश्वगंधा' ही एक अत्यंत गुणकारी औषधी वनस्पती ठरते.

अश्वगंधा ही आयुर्वेदातील प्रभावी औषधी वनस्पती मानली जाते. विशेषतः पुरुषांच्या आरोग्यासाठी ती उपयुक्त आहे.

अश्वगंधा पुरुषांच्या शरीरातील 'टेस्टोस्टेरॉन'ची पातळी वाढवण्यास मदत करते. ज्यांना शरीरसौष्ठव बनवायचे आहे, त्यांच्यासाठीही हे फायदेशीर आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होण्याची समस्या वाढली आहे.

अश्वगंधामधील पोषक घटक केवळ शुक्राणूंची संख्याच वाढवत नाहीत, तर त्यांची गुणवत्ता आणि हालचाल सुधारण्यासही मदत करतात.

अश्वगंधा कशी घ्यावी? यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.