पुढारी वृत्तसेवा
पूर्व क्रिकेटर संजय बांगड यांचा मुलगा आर्यनने आपला सेक्स चेंज केला आणि आर्यनचा अनया झाली.
अनायाने सांगितले की जेंव्हा ती यूकेला होती. व्हिडिओ कॉलवर कुटुंबासोबत बोलणे व्हायचे तेंव्हा अथर्वची पहिली भावना गोंधळलेली होती.
अनायाने आपल्या ट्रांजिशनबद्दल खुलेपणाने सांगितले. तेंव्हा तिने छोट्या भावाला एक साधा प्रश्न विचारला. मी पहिल्यांदा सांगितले तेंव्हा तुला कसे वाटले?
अथर्व म्हणाला, मला वाटले की तू गे आहेस. मी त्यावेळी ही सर्व गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करत होतो.
अथर्व म्हणाला, माझ्यासाठी हे महत्वाचे नाही की तू मुलगा आहेस की मुलगी. तू तोच माणूस आहेस आणि पहिल्यापेक्षा उत्तम आहेस.
हार्मोन्स थेरेपीमुळे अनायाच्या शरीरातील बदल स्पष्ट दिसत होते. मात्र अथर्वसाठी हे सर्व साधारण नव्हते
अथर्वसाठी हे महत्वाचे होते की, त्याचा कुटुंबातला एक सदस्य पुन्हा आला आहे. त्यांच्यासाठी जेंडरपेक्षा आपला माणूस आला आहे हे महत्वाचे होते.
अथर्व म्हणाला मला असे वाटले नाही, की कोणी निघुन गेलंय. मला वाटले ती व्यक्ती पहिल्यापेक्षा दहापट अधिक चांगला होवून परतली आहे. आता पहिल्यापेक्षा तू अधिक मोकळेपणाने आणि प्रामाणिपणे बोलतेस.
अथर्वचा कुटुंबासाठी हा एक मॅसेज होता की, हा काही फेज नाही. हाच तीचा खरेपणा आहे. विना अटी, शर्ती आणि पाठिंब्याशिवाय ही सर्वात मोठी ताकद आहे. हे ऐकून शनाया भावूक झाली आणि म्हणाली, 'माय गॉड, हा तर खूप गोड आहे.'