पुढारी वृत्तसेवा
औषधांची रिकामी पाकिटे फेकू नका!
औषधे संपल्यानंतर उरणाऱ्या ब्लिस्टर पॅकेटचा घरातील अनेक कामांसाठी पुनर्वापर करता येतो.
जळलेली कढई स्वच्छ करण्यासाठी
रिकाम्या पट्टीचे छोटे तुकडे करून स्क्रबरप्रमाणे वापरल्यास जळलेले डाग आणि हट्टी घाण काढण्यास मदत होते.
हट्टी डागांवर प्रभावी
फॉइलची खडबडीत पृष्ठभाग भांड्यांवरील चिकटलेली घाण साफ करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
गॅस स्टोव्हचे कोपरे स्वच्छ करा
पट्टीचे पातळ कडे बर्नर, बटणे आणि अरुंद जागांमधील साचलेली घाण सहज काढू शकता.
कात्रीची धार, नेल कटर अधिक प्रभावी बनवा
रिकाम्या औषधांच्या पट्ट्या काही वेळा कापल्यास कात्रीची धार पूर्वीपेक्षा चांगली होण्यास मदत मिळू शकते.
मिक्सरच्या ब्लेडची धार टिकवण्यासाठी
काही लोक पट्टीचे छोटे तुकडे मिक्सरमध्ये फिरवतात. मात्र हा उपाय करताना काळजी घ्या आणि जार नीट स्वच्छ धुवा.
बियाणे साठवण्यासाठी उत्तम
गार्डनिंगची आवड असणाऱ्यांसाठी या पट्ट्या लहान बियाणे सुरक्षित ठेवण्याचा सोपा पर्याय ठरू शकतात.
DIY आणि क्राफ्ट प्रोजेक्ट्ससाठी वापरा
शालेय प्रकल्प, सजावटीच्या वस्तू, रंगीत डिझाइन्स किंवा हस्तकला वस्तू तयार करण्यासाठीही रिकाम्या औषधांच्या पट्ट्या उपयोगी पडतात.