जुन्या चाव्या घरात ठेवतांय? मग थांबू शकते प्रगती!

पुढारी वृत्तसेवा

जुन्या आणि गंजलेल्या चाव्या काढून टाका

वापरात नसलेल्या, गंजलेल्या किंवा खराब झालेल्या चाव्या घरात ठेवू नयेत, असे वास्तुशास्त्रात मानले जाते.

बेकार चाव्या घराबाहेर करा

जुन्या कार, मोटरसायकल किंवा खराब झालेल्या कुलपांच्या चाव्या घरात पडून राहिल्यास नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते, अशी वास्तु मान्यता आहे.

गंजलेल्या चाव्यांकडे दुर्लक्ष करू नका

गंजलेल्या चाव्या अडथळ्यांचे प्रतीक मानल्या जातात. त्यामुळे अशा चाव्या घरातून हटवणे योग्य मानले जाते.

चाव्या पश्चिम दिशेला ठेवा

वास्तुशास्त्रानुसार चाव्या ठेवण्यासाठी पश्चिम दिशा शुभ मानली जाते. येथे की-होल्डर लावून चाव्या व्यवस्थित ठेवू शकता.

चाव्या ठरावीक ठिकाणीच ठेवा

चाव्या घरात इथे-तिथे न ठेवता नेहमी एका निश्चित जागी ठेवाव्यात. यामुळे घरातील वस्तू व्यवस्थित राहतात.

पूजाघरात चाव्या ठेवू नका

पूजाघर हे पवित्र स्थान असल्याने तेथे चाव्यांसारख्या दैनंदिन वापरातील वस्तू ठेवू नयेत, अशी वास्तु मान्यता आहे.

किचनमध्येही चाव्या ठेवणे टाळा

वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये चाव्या ठेवणे योग्य मानले जात नाही. त्यामुळे चाव्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित करा.

की-रिंग खराब झाल्यास बदला

तुटलेली किंवा खराब झालेली की-रिंग त्वरित बदलावी. चाव्यांचा गुच्छ स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणेही महत्त्वाचे मानले जाते.

जुन्या चाव्या हटवल्यानंतर स्वच्छता करा

बेकार चाव्या काढून टाकल्यानंतर त्या जागेची स्वच्छता करा. इच्छेनुसार धूप किंवा कापुराने घराचे शुद्धीकरण करू शकता.

टीप: वरील उपाय वास्तुशास्त्रातील मान्यतांवर आधारित आहेत. याला वैज्ञानिक पुरावा असल्याचा दावा करता येत नाही.