Sonali Kulkarni : ‘जांभुळ पिकल्या झाडाखाली...!’, ‘अप्सरा’ सोनालीची परफेक्ट स्टाईल

पुढारी वृत्तसेवा

जांभळ्या रंगाची जादू!

सोनाली कुलकर्णीने परिधान केलेल्या या गडद जांभळ्या साडीने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

स्लीव्हलेस ब्लाउज अन् ग्लॅमरस अंदाज!

साडीसोबतचा मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाउज सोनालीच्या या बोल्ड लूकला अधिकच स्टायलिश बनवतोय.

साडीतलं सौंदर्य!

कोणताही पेहराव असो, पण साडीमध्ये सोनालीचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.

नखरा आणि नजाकत!

सोनालीच्या या दिलखेच अदा पाहून चाहते घायाळ झाले नाहीत तरच नवल!

क्लासी आणि एलिगंट!

कमीतकमी दागिन्यांसह सोनालीने या 'रॉयल पर्पल' लूकला अतिशय क्लासिक पद्धतीने कॅरी केलं आहे.

अप्सरा आली...

मराठी सिनेसृष्टीची ही 'अप्सरा' या जांभळ्या रंगाच्या साडीत एखाद्या स्वप्नसुंदरीसारखी भासतेय.

फॅशन आयकॉन!

फॅशनच्या बाबतीत सोनाली नेहमीच नवनवीन प्रयोग करत असते आणि तिचा हा साडी लूक सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

स्मितहास्य असं की...

तिच्या या ग्लॅमरस लूकसोबतच तिच्या मोहक स्मितहास्याने फोटोंमध्ये एक वेगळीच जान आणली आहे.