पुढारी वृत्तसेवा
लहानपणापासून सफरचंद खाण्याचे फायदे ऐकलेत, पण बियांबद्दल सत्य काय?
सफरचंदाच्या बियांमध्ये काय असतं?
त्यात Amygdalin नावाचे संयुग असते, जे विषारी ठरू शकते.
शरीरात काय होतं?
बी चघळून खाल्ल्यास अमिग्डालिनचे रूपांतर हायड्रोजन सायनाईडमध्ये होते.
सायनाईड किती धोकादायक?
हे शरीरातील ऑक्सिजन पुरवठा थांबवू शकते.
लक्षणे कोणती दिसू शकतात?
चक्कर येणे, रक्तदाब वाढणे, अशक्तपणा किंवा गंभीर स्थितीत झटका.
किती बिया खाल्ल्या तर धोका?
८०–५०० बिया शरीरासाठी जीवघेण्या ठरू शकतात.
१-२ बिया खाल्ल्या तर?
साधारणतः काही नुकसान होत नाही, पण सवय धोकादायक ठरू शकते.
इतर कोणत्या फळांच्या बिया टाळाव्यात?
पीच, चेरी, बदाम यांसारख्या फळांच्या बियांमध्येही अमिग्डालिन असते
सुरक्षित खाण्याचा मार्ग
सफरचंद खाताना नेहमी बिया काढूनच खा... आरोग्य सुरक्षित ठेवा!