पुढारी वृत्तसेवा
निरोगी आरोग्यासाठी दररोज सफरचंदाचा रस पिणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. जाणून घ्या याचे ५ मुख्य फायदे!
सफरचंदाच्या रसामध्ये 'फ्लेव्होनॉइड्स' आणि 'पॉलीफेनॉल' सारखे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात.
हे अँटीऑक्सिडंट्स वाईट कोलेस्टेरॉलचे ऑक्सिडेशन रोखतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा येत नाही आणि हृदय निरोगी राहते.
यात मुबलक प्रमाणात असलेले व्हिटॅमिन 'सी' आणि अँटीऑक्सिडंट्स फ्री रेडिकल्सशी लढण्यास मदत करतात.
रोज सफरचंदाचा रस प्यायल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात, सुरकुत्या उशिरा येतात आणि त्वचेचा नैसर्गिक ग्लो वाढतो.
सफरचंदाच्या रसातील व्हिटॅमिन 'सी' शरीराची रोगप्रतिकारक क्षमता बळकट करण्यास मदत करते.
नियमित रस प्यायल्याने हवामान बदलामुळे होणारे संसर्ग, सर्दी, पडसे आणि थकवा यांपासून सुटका मिळते.
सफरचंदाच्या रसात सुमारे ८८% पाणी असते, जे शरीराला दिवसभर हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.
यातील 'मॅलिक ॲसिड' पचनक्रिया सुलभ आणि सुरळीत ठेवण्यास मदत करते.
सफरचंदाचा रस मेंदूतील 'ॲसिटिलकोलीन'चे प्रमाण टिकवून ठेवतो, ज्यामुळे स्मरणशक्ती तीव्र होते आणि वयानुसार येणारा विसरभोळेपणा कमी होतो.