स्वालिया न. शिकलगार
अंशुलाने लग्नात केलेल्या ब्रायडल लूकमागील भावनिक कहाणी सोशल मीडियावर शेअर केलीय
तिने लिहिलंय-'नवरी मुलगी म्हणून सजताना मला एकच गोष्ट माझ्यासोबत ठेवायची होती'
'माझ्या आईचा ४२ वर्षे जुना 'गोल्ड टिश्यू जरदोजी'चा दुपट्टा'
'..ज्यांनी मला लहानाचे मोठे केले, त्यांच्या प्रेमाची ऊब अंगावर असणे मला योग्य वाटले'
पोशाखावर कलाकुसरीचा सुंदर संगम, 'कशिदा' भरतकाम व समृद्ध 'झरी'चे काम होते
ज्या कुटुंबात मी प्रवेश करत आहे, त्या परंपरेचा आदर म्हणून 'बांधणी घरचोला' दुपट्टा होता
पोषाखाला 'अँटीक रोझ', 'ब्लश', 'म्युटेड गोल्ड' रंग नाजूक 'फुलकारी' काठांची जोड दिली होती
तिने शेवटी डिझायनर्सचे आभार देखील मानले