Animals Weird Habits: स्वतःची विष्ठा खाणारा प्राणी... 'या' प्राण्यांच्या सवयी आहेत जगावेगळ्या!

Anirudha Sankpal

गोगलगाय धारदार चाकू किंवा ब्लेडवरून सहज चालू शकते, तरीही तिच्या शरीराला कोणतीही इजा होत नाही.

गोगलगायीच्या शरीरातून स्रवणारा 'म्युकस' (चिकट द्रव) एका संरक्षक कवचासारखे काम करतो, जो तिला कापण्यापासून वाचवतो.

डायक वटवाघूळ (Dayak Bats) हा जगातील एकमेव असा नर प्राणी आहे, जो आपल्या पिलांसाठी स्वतः दूध तयार करू शकतो.

प्लॅटिपस हा प्राणी निसर्गातील सर्वात वेगळा जीव मानला जातो, कारण तो अंडी घालतो आणि आपल्या पिलांना दूधही पाजतो.

विज्ञानाच्या भाषेत प्लॅटिपसला 'मोलोट्रेम' म्हणतात, जे सस्तन प्राणी असूनही पक्ष्यांप्रमाणे अंडी घालण्याची वैशिष्ट्ये जपतात.

निसर्गातील या विचित्र सवयी केवळ आश्चर्यासाठी नसून, त्या त्या प्राण्याला पर्यावरणात जिवंत राहण्यासाठी मदत करतात.

फॅक्ट्स माइनच्या (Facts' Mine) अहवालानुसार, प्राणी जगतात असे अनेक 'रूल ब्रेकर्स' आहेत जे विज्ञानालाही कोड्यात टाकतात.

ससे स्वतःची विष्ठा (Night Poop) पुन्हा खातात, कारण त्यात आवश्यक पोषक घटक आणि व्हिटॅमिन्स असतात जे त्यांच्या आरोग्यासाठी गरजेचे असतात.

येथे क्लिक करा