Animal Teeth | तुम्हाला माहिती आहे का विविध प्राण्यांच्या दातांची संख्या किती असते?

Namdev Gharal

बिवर हा प्राणी झाडे पोखरण्यात माहीर असतो याला 20 दात असतात

हत्ती हा जमीनिवरील सर्वात मोठा प्राणी याचे भले मोठे दोन सुळे असतात पण अन्न् चावण्यासाठी याला 26 दात असतात

जंगलाचा राजा सिंह हा आपल्या ताकदवर जबड्यासाठी ओळखला जातो. मोठ्या प्राण्याची शिकार करणाऱ्या सिंहाला 30 दात असतात

पृथ्वीवरील सर्वात बुद्धीमान म्हणजे मानव प्राणी मानवाला निसर्गाने 32 दात दिले आहेत

मानवाचा सर्वात जवळचा प्राणी असलेला मित्र म्हणजे कुत्रा, हा मुळचा जंगली प्राणी याला 42 दात असतात

पाण्यामधील महाकाय भितीदायक व पृथ्वीवरील सर्वात प्राचिन प्राणी म्हणजे मगर, याला टोकदार असे 80 दात असतात

समुद्रातील बुद्धीमान जीव असलेल्या डॉल्फिन माशाला100 दात असतात

समुद्रातीलच खतरनाक शिकारी असलेल्या शार्क माशाला 300 दात असतात जे पडून नवीन उगवत असतात

या लिस्टमध्ये सर्वात जास्त दात असलेला प्राणी अगदी छोटा आहे तो म्हणजे गोगलगाय, याला 20 हजार दात असतात, हे काट्यासारखे अगदी छोटे छोटे असतात.