Anger side effects: सततच्या रागामुळे तुम्हाला 'हे' ५ आजार होऊ शकतात!

पुढारी वृत्तसेवा

राग प्रत्येकाला येतो पण सतत राग आल्याने काही विकार होऊ शकतात. यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही; परंतु हे खरं आहे.

१) पोटाचे विकार

रागीट किंवा तापट स्वभावामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. अपचन, बद्धकोष्ठता, पोटदुखी यासारखे विकार रागामुळे होऊ शकतात.

२) डोकेदुखी

रागीट आणि संतापी स्वभावामुळे डोकेदुखीचा आजार बळावतो. एखादी गोष्ट मनाविरुद्ध किंवा विचाराविरुद्ध झाली की, संताप अनावर होतो आणि डोकेदुखी वाढते.

३) हदयविकार

सातत्याने रागीट, क्रोधीत स्वभावामुळे ताण कायम राहतो. परिणामी, हृदयविकाराचा आजार जडण्याचा धोका संभवतो.

Heart Attack | pudhari

अशा स्वभावाच्या व्यक्तींना हृदयविकाराचा तीव्र झटका येण्याची शक्यता अधिक असल्याचे अनेक अभ्यासातूनही दिसून आले आहे.

Canva

४) नैराश्य

क्रोधीत स्वभाव हा नैराश्याकडे नेण्यास कारणीभूत ठरू शकतो.

एखादा निर्णय किंवा गोष्ट मनासारखी झाली नाही, तर आपण निराश होतो आणि त्याचा राग अन्य वस्तूंवर किंवा व्यक्तींवर काढतो.

५) उच्च रक्तदाब

रागीट स्वभाव हा उच्च रक्तदाबाला हमखास कारणीभूत ठरू शकतो. कालांतराने आरोग्याचे प्रश्न गंभीर निर्माण होऊ शकतात.