Namdev Gharal
सध्या जनरेशन झेड मध्ये सैयारा चित्रपटाची हवा आहे. त्यांच्या काळाशी रिलेट करणारी या चित्रपटाची कहाणी आहे
या चित्रपटाने अनीत पड्डा व अहान पांडे यांना एका रात्रीत स्टार केले आहे
फ्रेश चेहरे फ्रेश कहाणी व गाणी यामुळे मोहित सुरीच्या या चित्रपटाला तरुणाईने डोक्यावर घेतले
या चित्रपटाची नायीका अनीतने फिल्मच्या सिन्समधील काही फोटो शेअर केले आहेत
या फोटोमध्ये चित्रपटातील विविध सिन्समधील कॉस्च्युममध्ये ती दिसून येत आहे
तिने शेअर केलेल्या विविध भावना दर्शविणाऱ्या या फोटोंमधून अनीतचे सौंदर्य अधिकच खुलले आहे
अनीत मुळची पंजाबी असून तिचा जन्म अमृतसरमध्ये २००२ मध्ये झाला
अनीतने आपली फिल्मी कारकीर्द ‘सलाम वेंकी’ या चित्रपटापासून केली
ॲमेझॉन प्राइमच्या 2024च्या ‘बिग गर्ल्स डोन्ट क्राय‘ या वेबसिरीजमध्ये तीने हॉस्टेलवर राहणाऱ्या कॉलेज तरुणींची भूमिका केली होती