पुढारी वृत्तसेवा
मॅडॉकचा शक्ती शालिनी हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री अनीत पड्डा दिसणार आहे.
मोहित सुरी दिग्दर्शित रोमँटिक 'सैय्यारा' मधील भूमिका तिच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरली.
अनीत डिसेंबर ते जानेवारी या काळात कॉलेजच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांना सामोरी जाणार आहे. परीक्षा संपल्यानंतरच ती पुढील चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल.
अनीत आपल्या कामासोबतच शिक्षणालाही तितकेच महत्त्व देत असून, ती तिची बी.ए. (ऑनर्स) राज्यशास्त्र विषयाची अंतिम परीक्षा देणार आहे.
एकीकडे मोठमोठे चित्रपट तिच्या हातात आहेत, तर दुसरीकडे तिने शिक्षणाला प्राधान्य दिलं आहे.
सध्या अनीत परीक्षेच्या तयारीसाठी अभ्यासात व्यस्त आहे.
दिनेश विजन यांचा 'शक्ती शालिनी' हा चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
अनीतने २०१२ मध्ये 'सलाम वेंकी'मध्ये छोट्या भूमिकेतून करिअरची सुरुवात केली.