Falcon: १५० ग्रॅमचा पक्षी रोज करतोय १००० किमीचा प्रवास... हे कसे शक्य आहे?

पुढारी वृत्तसेवा

निसर्गाच्या अद्भुत दुनियेत 'अमूर ससाणा' नावाच्या चिमुकल्या पक्ष्याने शास्त्रज्ञांनाही चकित केले आहे.

Falcon

'अपपांग' नावाच्या अवघ्या १५० ग्रॅम वजनाच्या पक्ष्याने दररोज सरासरी १,००० किलोमीटर वेगाने प्रवास करत, ७६ तासांत तब्बल ३,१०० किलोमीटरचे नॉनस्टॉप हवाई अंतर कापले आहे.

Falcon

वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील 'मणिपूर अमूर फाल्कन ट्रॅकिंग प्रोजेक्ट' अंतर्गत, ११ नोव्हेंबर २०२५ रोजी तीन ससाण्यांना उपग्रह ट्रॅकर लावण्यात आले.

Falcon

यामध्ये अपपांग (प्रौढ नर), अलंग (तरुण मादी) आणि अहू (प्रौढ मादी) यांचा समावेश होता.

Falcon

या ससाण्यांच्या प्रवासाची सुरुवात मणिपूरच्या घनदाट जंगलातून आणि शेतजमिनीतून झाली.

Falcon

अपपांगने स्थलांतरास सुरुवात केल्यानंतर अवघ्या ७६ तासांत मध्य भारत, गुजरात ओलांडून अरबी समुद्राच्या किनाऱ्याकडे झेप घेतली.

Falcon

मध्य भारत, गुजरात ओलांडून तो अरबी समुद्राकडे निघाला. दररोज सरासरी १,००० किलोमीटरचा वेग राखत, तो ग्रहावरील सर्वात वेगवान स्थलांतरित पक्ष्यांपैकी एक ठरला आहे.

Falcon

या अमूर ससाण्यांना भारतातून सोमालियापर्यंतचे नॉनस्टॉप ६,००० किलोमीटरचे महासागरीय अंतर पार करायचे आहे.

Falcon

या ससाण्यांच्या प्रवासासाठी मणिपूर हे एक अत्यंत महत्त्वाचे थांबा केंद्र आहे. पूर्व आशियातून दक्षिण आफ्रिकेकडे स्थलांतर करताना हे पक्षी येथे हिवाळ्यात थांबतात.

Falcon