पुढारी वृत्तसेवा
तेलंगणातील वेमुलावाडा येथे एक अनोखे श्री लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर आहे. ज्या मंदिरात जाण्यासाठी नागाच्या पोटातून जावे लागते
वेमुलवाडा येथील नंपल्ली गुट्टा येथे एका डोंगारवर हे अनोखे मंदिर उभारण्यात आले आहे. भल्यामोठ्या नागाच्या आकाराचे हे मंदिराचे बांधकाम अनोखे आहे
भाविक या नागाच्या मुखातून प्रवेश करून त्याच्या पोटातून बनवलेल्या मार्गाने पुढे जातात. या नागाच्या मस्तकावर श्रीकृष्ण नर्तन करत असल्याचे दाखवले आहे
भगवान विष्णूचा अवतार असलेल्या भगवान लक्ष्मी नरसिंह यांना समर्पित हे मंदिर असून ज्या खडकाभोवती हे मंदिर उभारले गेले आहे, त्याच खडकातून येथील मूर्ती कोरण्यात आली आहे.
भाविक सापाच्या पोटातून - म्हणजेच एका लांब आणि वळणावळणाच्या बोगद्यातून - या मंदिरात प्रवेश करू शकतात.
येथे प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू यांच्या कथेचे चित्रण करणारी शिल्पे आहेत. बोगद्याच्या शेवटी, भगवान नरसिंह राक्षस हिरण्यकश्यपूचा वध करत असल्याचे शिल्प पाहायला मिळते.
येथे नाग देवतेच्या काही प्राचीन मूर्तीही आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वारावर, खांब फोडून बाहेर पडणाऱ्या भगवान नरसिंहाची मूर्ती पाहायला मिळते.
या डोंगरावरील मूळ स्वयं भू नरसिंह स्वामींची गुहा अत्यंत प्राचीन मानली जाते. परंतु आधुनिक मंदिराची पुनर्बांधणी १९९८-२००० दरम्यान स्थानिक भाविक, देवस्थान ट्रस्ट ने केला आहे