पुढारी वृत्तसेवा
आवळा हा एक 'सुपरफूड' मानला जातो आणि त्याला तसे मानण्याची अनेक ठोस कारणे आहेत. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात.
पण, एक गोष्ट जी अनेक लोकांना माहीत नसते, ती म्हणजे आवळा खाणे प्रत्येकासाठीच फायद्याचे नसते.
आवळा कितीही आरोग्यदायी असला तरी, काही लोकांच्या शरीरावर त्याचा उलटा परिणाम देखील होऊ शकतो.
1)ज्यांची साखर खूप कमी होते
आवळा रक्तातील साखर आणखी कमी करतो. साखर पातळी लवकर कमी होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय आवळा खाऊ नका.
2) ॲसिडिटीचा त्रास असणारे लोक
ज्यांचे पोट संवेदनशील आहे, त्यांच्यासाठी आवळा कधीकधी त्रास वाढवू शकतो. आवळा आंबट आणि आम्लयुक्त असतो. त्यामुळे तो ॲसिडिटी, छातीत जळजळ, गॅस, पोट फुगणे आणि पोटदुखी अशा समस्या निर्माण करू शकतो.
जर तुम्हाला आधीच अल्सर, गॅस्ट्रायटिस किंवा ॲसिड रिफ्लक्सचा त्रास असेल, तर कच्चा आवळा किंवा रिकाम्या पोटी आवळा खाणे टाळावे.
3) रक्त पातळ करणारी औषधे घेणारे
आवळा स्वतःहूनही रक्त पातळ करण्याचे काम करतो. जर तुम्ही वॉर्फरिन, ॲस्पिरिन , क्लोपिडोग्रेल यांसारखी औषधे घेत असाल, तर आवळ्यामुळे रक्तस्राव होण्याचा धोका वाढू शकतो.
4) ज्यांना किडनीचा त्रास किंवा मुतखडा आहे
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी जास्त असते, जे शरीरात जाऊन ऑक्सालेट तयार करते. हेच ऑक्सालेट किडनी स्टोन वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते.
5) गरोदर महिला
गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी आवळा अल्प प्रमाणात घेणे सुरक्षित असते, पण जास्त प्रमाणात सेवन केल्यास पोटाचा त्रास वाढू शकतो.
6. ज्यांना ॲलर्जी आहे
काही लोकांना आवळ्याची ॲलर्जी असू शकते. अशा वेळी खाज, अंगावर पुरळ, सूज, मळमळ किंवा पोटदुखी अशी लक्षणे दिसू शकतात. जर तुम्हाला असे काही जाणवले, तर त्वरित आवळा खाणे बंद करावे.