Ambahalad Benefits: आंबेहळदीचे हे अद्भूत फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

पुढारी वृत्तसेवा

का म्हणतात 'आंबेहळद'?

या हळदीला कच्च्या आंब्यासारखा (कैरीसारखा) सुवास येतो, म्हणून हिला 'आंबेहळद' म्हणतात. ही हळद सामान्य हळदीसारखी मसाल्यात वापरली जात नाही. उपयोग जाणून घ्या.

रक्त साकळल्यास : आंबेहळद उगाळून गरम करून लावली असता, रक्त मोकळे होऊन सूज व वेदना कमी होतात.

मुकामार, लचक : आंबेहळद, साजीखार, मैदा लकडी यांचा एकत्र वाटून लेप करावा.

कृमी विकार : आंबेहळद, सैंधव एकत्र वाटून लहान मात्रेत देऊन वर गरम पाणी पिण्यास देतात.

गाठ : गाठीवर आंबेहळद उगाळून लेप केल्यास गाठ बसते.

मुकामार व सूज : आंबेहळद, रक्तचंदन, कोरफड गीर, अर्जुनसादडा व मुलतानी माती यांचा एकत्र स्खल करून लेप करावा.

जखम भरून येण्यास : आंबेहळद, जेष्ठमध, अर्जुनसादडा, पपया, कडुनिंबाची पाने यांचा एकत्र वाटून जखमेवर लेप करावा.

मार लागून सूज, ठणका, संधिवाताची सूज, गाठी: नुसती आंबेहाळद दाट उगाळून गरम करून लेप करावा.

ठेच, आघात : आंबेहळद व हिराबोळ (कोरफडीचा सुकविलेला गर) उगाळून गरम करून लेप करावा.

खाज, त्वचा उजळण्यास व त्वचेवरील बारीक लव निघण्यास : आंबेहळद उगाळून लेप करावा.

पुरळ : आंबेहळद, कडू जिरे गोमूत्रात वाटून लेप करावा.