Ambahalad Benefits: मुका मार, लचक किंवा रक्त साकळल्यास काय करावे? जाणून घ्या आंबेहळदीचा आयुर्वेदिक उपाय

पुढारी वृत्तसेवा

आंबेहळद म्हणजे काय?

आंबेहळद या औषधी वनस्पतीचा आंब्याच्या कैरीसारखा वास येतो म्हणून आंबेहळद म्हणतात. सर्वसामान्य हळदीप्रमाणे मसाल्यात तिचा उपयोगी होत नाही. आंबहळदीचे अनेक आयुर्वेदीक फायदे आहेत.

रक्त साकळल्यास काय करावे?

आंबेहळद उगाळून गरम करून लावली असता, रक्त मोकळे होऊन सूज व वेदना कमी होतात.

मुकामार किंवा लचक भरल्यास काय करावे?

आंबेहळद, साजीखार, मैदा लकडी यांचा एकत्र वाटून लेप करावा.

मुकामार आणि सूज असल्यास काय करावे?

आंबेहळद, रक्तचंदन, कोरफड गर, अर्जुनसादडा व मुलतानी माती यांचा एकत्र खल करून लेप करावा.

आंबेहळदीचे इतर उपयोग

अंगावर बारीक पुरळ : आंबेहळद, कडू जिरे गोमूत्रात वाटून लेप करावा.

मार लागून सूज, ठणका, संधिवाताची सूज, गाठी: नुसती आंबेहाळद दाट उगाळून गरम करून लेप करावा.

खाज, त्वचा उजळण्यास व त्वचेवरील बारीक लव निघण्यास आंबेहळद उगाळून लेप करावा.

ठेच, आघात : आंबेहळद व हिराबोळ (कोरफडीचा सुकविलेला गर) उगाळून गरम करून लेप करावा.

गाठ : गाठीवर आंबेहळद उगाळून लेप केल्यास गाठ बसते.