Wildlife : ५ फूट उंची.. बुटासारखी चोच! भेटा मगरीची शिकार करणाऱ्या 'शूबिल' पक्षाला

पुढारी वृत्तसेवा

शूबिल हा जगातील सर्वात विचित्र दिसणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. पूर्व आफ्रिकेतील दलदलीच्या भागात याचं प्रामुख्याने वास्तव्य असतं.

या पक्ष्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची चोच! चोचीचा आकार अगदी एखाद्या 'बुटासारखा' (Shoe) असतो, म्हणूनच याला 'शूबिल' असे नाव पडले आहे.

हा पक्षी साधारण ५ फूट उंच असतो. याची चोच जवळपास १ फूट लांब आणि टोकाला अत्यंत अणकुचीदार असते, ज्यामुळे तो सहज शिकार करू शकतो.

शूबिल अतिशय निडर आहे. तो फक्त मासे खात नाही, तर चक्क लहान मगरी आणि विषारी सापांचीही शिकार करण्याची ताकद ठेवतो.

शिकार करताना हा पक्षी तासन्‌तास एकाच जागी पुतळ्यासारखा स्थिर उभा राहू शकतो. त्याची ही एकाग्रता पाहून भल्याभल्यांना आश्चर्य वाटते.

इतका बुद्धिमान शिकारी असूनही याला 'स्टुपिड बर्ड' म्हटले जाते. कारण, अनेकदा समोर शिकार असूनही तो काय करावे या विचारात गोंधळलेल्या अवस्थेत शांत उभा राहतो.

शूबिलची निर्णयक्षमता अत्यंत कमकुवत मानली जाते. परिस्थितीचे आकलन करून तातडीने कृती करण्यात तो अनेकदा मागे पडतो.

सध्या संपूर्ण जगात केवळ ५,३०० शूबिल शिल्लक आहेत. वाढती शिकार आणि नष्ट होत जाणारे अधिवास यामुळे हा अनोखा पक्षी आता संकटात आहे.