तिरूपती बालाजी मंदिरातील अद्भूत रहस्य

निलेश पोतदार

तिरूपती मंदिर हे फक्त एक धार्मिक स्थान नाही तर श्रद्धा आणि भक्तीचे एक चमत्‍कारी केंद्र आहे. तिरूपती बालाजी मंदिरात भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीशी जोडलेल्या अनेक अद्भूत आणि रहस्यमय मान्यता आहेत.

भगवान व्यकंटेश्वराची मूर्ती गुळगुळीत पाषाणापासून बनविण्यात आली आहे. मात्र ती जिवंत भासते. येथील मंदिरातील वातावरण एकदम थंड ठेवण्यात येते. तरीही मान्यता आहे की, बालाजींच्या मूर्तीला घामाप्रमाणे पाण्याचे थेंब दिसतात. तसेच पाठीचा भाग नेहमीच ओलसर असल्याचे दिसते. याला भक्तांकडून देवाच्या अलौकिक शक्तीचे प्रमाण मानले जाते.

व्यंकटेश्वराच्या मूर्तीवर जेंव्हा चंदनाचा लेप लावला जातो. जेंव्हा तो लेप काढला जातो तेंव्हा छातीजवळ चंदनाच्या लेपावर लक्ष्मीची आकृती उमटल्याचे दिसते. याला भक्तांकडून देवाच्या हृदयात लक्ष्मीची स्थान असल्याचे मानले जाते.

व्यंकटेश्वराच्या मूर्तीवर पचाई कापूराचा वापर केला जातो. हा कापूर अत्‍यंत उष्ण असल्याचे मानले जाते. तो दगडावर लावला तर तो दगडही तडकतो मात्र भगवान व्यंकटेश्वरालाच्या मूर्तीवर याचा काही परिणाम होत नाही.

तिरूपती बालाजी मंदिरात एक दिवा आहे जो शतकानुशतके कोणत्‍याही तेला किंवा तुपाशिवाय प्रज्वलित आहे. तो नेहमी तेवत राहतो अशी भक्तांची श्रद्धा आहे.

भगवान तिरूपतीच्या मूर्तीवर कान लावल्यास त्‍यातून समुद्राच्या लाटांचा ध्वनी ऐकू येतो. पण इथे जवळपास समुद्र नाही. या पाठीमागे कोणते वैज्ञानिक कारण असल्यास ते पूर्णपणे स्पष्ट होऊ शकलेले नाही.

भगवान व्यकटेश्वराला पुरूष आणि स्त्री दोघांचे वस्त्र परिधान केले जातात. मूर्तीला धोतर आणि वर साडीने सजवले जाते. त्‍याला पौराणिक कथा आणि अध्यात्‍मिक दर्शनाशी जोडले आहे. भगवान विष्णूमध्येच लक्ष्मी माता सामावलेली आहे अशी मान्यता आहे त्‍यामुळे असे केले जाते.

भगवान व्यंकटेश्वराच्या मूर्तीवरचे केस हे खरे केस आहेत. ते सामान्य केसांप्रमाणेच आहेत. यांचा कधीच गुंता होत नाही. ते कायम मुलायम आणि चमकदार राहतात. त्‍याला देवाची दिव्यता आणि अलौकिक स्वरूपाचे प्रतिक मानले जाते. त्‍यामुळे मंदिराचे पुजारी त्‍याची खास काळजी घेतात.

भक्त जेंव्हा तिरूपती बालाजी मंदिरात प्रवेश करतात. तेंव्हा व्यंकटेश्वराची मूर्ती गर्भगृहात मध्यभागी असल्याचे दिसते. मात्र वास्तवात मूर्ती उजव्या बाजूला स्थापित आहे. हा अनोखा दृष्टीभ्रम मंदिराची वास्तू आणि मूर्ती स्थापनेची अव्दितीयता दर्शविते.

तिरूपती बालाजी मंदिरापासून 23 किमी वर एक गाव आहे. जिथे बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश नाही. इथले लोक कडक नियमात राहतात. भगवान बालाजीसाठी येथूनच फुले, फळे, दूध, दही, तूप येते. येथील महिला शिवलेले कपडे धारण करत नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.