पुढारी वृत्तसेवा
बैठी जीवनशैलीमुळे अनेक व्याधी जडू लागल्या आहेत. यावर उपाय म्हणून घरच्या घरी व्यायाम करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत
दिवसाला केवळ ५० पायऱ्या चढल्यास गंभीर आजारांचा धोका २० टक्क्यांनी कमी होतो, असे एका अभ्यासानुसार समोर आले आहे
पायऱ्या चढल्याने रक्ताभिसरण सुधारून हृदयाची गती वाढते आणि बीपी (BP) नियंत्रणात राहून हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होते
नियमित पायऱ्या चढल्याने हाडे बळकट होऊन उतारवयात सांधेदुखी किंवा हाडांच्या आजारांचा धोका कमी होतो
जिना चढणे हा पायांच्या स्नायूंसाठी सर्वोत्तम व्यायाम आहे. यामुळे शरीर लवचिक आणि मजबूत बनण्यास मदत होते
पायऱ्या चढल्याने 'एरोबिक व्यायाम' होऊन कॅलरीज वेगाने बर्न होऊन वजन कमी होण्यास मदत होते
पायऱ्या चढल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होऊन मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते
पायऱ्या चढल्याने शरीराचे संतुलन सुधारून शरीर अधिक ॲक्टिव्ह होऊन शरिराची लवचिकता आणि चपळता वाढण्यास मदत होते
पायऱ्या चढल्याने 'डोपमाइन' हार्मोन्स तयार होऊन मानसिक आरोग्य सुधारते, मूड सुधारून ताणतणाव कमी होण्यास मदत होते