पुढारी वृत्तसेवा
सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाल्ल्याने शरीराला काय फायदे होतात? चला जाणून घेऊया...
कच्च्या लसणामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात, जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
रोज सकाळी कच्चा लसूण चघळून खाल्ल्याने तुम्ही सर्दी, खोकला, ताप आणि इतर हंगामी आजारांपासून दूर राहू शकता.
लसूण नैसर्गिकरित्या रक्त पातळ करण्याचे काम करतो. यामुळे रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजचा धोका कमी होतो आणि हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
सकाळी रिकाम्या पोटी लसणाचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताभिसरण (Blood Circulation) सुधारते आणि घातक 'बैड कोलेस्ट्रॉल' कमी होण्यास मदत होते.
लसूण खाण्यामुळे पोटातील पाचक एन्झाईम्स अधिक सक्रिय होतात. हे आंतड्यांमधील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करून गॅस, ॲसिडिटी आणि बद्धकोष्टतेपासून आराम देतात.
लसणातील सल्फर कम्पाउंड्स शरीरातील विषारी पदार्थ (Toxins) बाहेर टाकतात. यामुळे लिव्हरची कार्यक्षमता वाढते, रक्त शुद्ध होते आणि त्वचेवर नैसर्गिक चमक येते.
मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांसाठी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाणे वरदान ठरू शकते. हे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण संतुलित ठेवून ब्लड शुगर अचानक वाढू देत नाही.