पुढारी वृत्तसेवा
नैसर्गिक थंडावा मिळतो
उन्हामुळे चेहऱ्यावर येणारी लाली आणि जळजळ कमी करण्यासाठी केळ्याची साल अत्यंत प्रभावी आहे. यातील दाहशामक (Anti-inflammatory) गुणधर्म त्वचेला त्वरित थंडावा देतात.
चिकटपणाशिवाय हायड्रेशन
उन्हाळ्यात जड क्रीम लावल्याने त्वचा तेलकट होते, पण केळ्याच्या सालीतील पोटॅशियम आणि व्हिटॅमिन A त्वचेला चिकटपणा न आणता नैसर्गिकरित्या हायड्रेट ठेवतात.
मुरुमांपासून सुटका
घाम आणि तेलामुळे उन्हाळ्यात पिंपल्सची समस्या वाढते. सालीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स बॅक्टेरियाशी लढून मुरुमांची सूज कमी करण्यास मदत करतात.
टॅनिंगवर रामबाण उपाय
कडक उन्हामुळे त्वचा काळवंडली असेल, तर सालीच्या आतील पांढऱ्या भागाने मसाज केल्यास त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.
डाग हलके होतात
केळ्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन C मुबलक प्रमाणात असते, जे चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिगमेंटेशन हळूहळू कमी करण्यास साहाय्यक ठरते.
त्वचेचा पोत सुधारतो
यातील 'ल्यूटीन' नावाचे घटक त्वचेची लवचिकता टिकवून ठेवतात, ज्यामुळे चेहरा अधिक फ्रेश आणि टवटवीत दिसतो.
वापराची योग्य पद्धत
केळ्याच्या सालीचा पांढरा भाग चेहऱ्यावर ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने चोळावा. जोपर्यंत साल काळपट किंवा तपकिरी होत नाही, तोपर्यंत मसाज करा.
असा मिळवा रिझल्ट
मसाज केल्यानंतर तो थर चेहऱ्यावर १५ ते २० मिनिटे तसाच राहू द्यावा. यामुळे पोषक घटक त्वचेत खोलवर मुरतात.
थंड पाण्याचा वापर
शेवटी चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवावा. यामुळे उन्हाळ्यातील थकवा दूर होऊन चेहरा नैसर्गिकरित्या ग्लो करू लागतो.