पुढारी वृत्तसेवा
प्रत्येक प्राण्याचं काही ना काही वैशिष्ट्य असतं. कोणी शिकार पकडण्यात पटाईत असतं, तर कोणाकडे एकापेक्षा जास्त हृदय असतात.
असाच एक प्राणी आहे ज्याची जीभ त्याच्या शरीरापेक्षा दुप्पट लांब असते. जाणून घेऊया हा प्राणी कोणता आहे आणि त्याच्याबद्दलच्या काही खास गोष्टी:
खरं तर, सरड्याची जीभ त्याच्या शरीरापेक्षा दुप्पट लांब असते.
सर्वच सरड्यांची जीभ इतकी लांब नसते. केवळ काही विशिष्ट प्रजातींमध्येच शरीराच्या तुलनेत दुप्पट लांबीची जीभ आढळते.
या लांब जिभेच्या मदतीने सरडा अवघ्या ०.०७ सेकंदात आपली शिकार पकडू शकतो.
सरडे आपले डोळे ३६० अंशांपर्यंत फिरवू शकतात. विशेष म्हणजे, ते एकाच वेळी दोन वेगवेगळ्या दिशांना आपले डोळे फिरवू शकतात.
सरडा जेव्हा रागात असतो, तेव्हा त्याचा रंग गडद होतो आणि तो शांत असतो तेव्हा फिकट रंगाचा दिसू लागतो.