Namdev Gharal
आहे राजगिऱ्याचा लाडू हा एकमेव पदार्थ तोही उपवासाच्या दिवशी आपल्या आहारात असतो. पण राजगिरा हा असे भरड धान्य आहे की जे आरोग्यासाठी सुपर फूड ठरते
राजगिऱ्याच्या लाह्या या पोषणमुल्याने भरपूर व प्रोटीनने भरलेले हे धान्य आहे जे आपण उपवासाच्या किंवा अधून मधून खाण्यापूरते मर्यादित केले आहे.
राजगिरा ही ‘अमरांथस’ (Amaranthaceae) कुळातील रुंद पानांच्या वनस्पतीचे बी आहे पण भरपूर पोषक घटकांमुळे याला पौष्टिक भरड धान्य म्हणूनच ओळखले जाते.
मॅग्नेशियम व आर्यन याचा उत्तम स्त्रोत असल्यामुळे तुमच्या हृदयाला ताकद देण्याचे काम हे करत असते, ग्लुटेन फ्री असल्याने गव्हाची अलर्जी असणाऱ्यांना चांगला पर्याय आहे.
यामध्ये लोहाचे (Iron) प्रमाण उत्तम असल्याने हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी राजगिरा खाणे गुणकारी ठरते.
हाडे कमजोर असतील, पायामध्ये गोळे येत असतील जिने चढताना उतरताना त्रास होत असेल तर तुम्ही राजगिरा लाह्या तुम्ही खाण्यास सुरवात करा
राजगिऱ्याचा साखर नसलेला लाडू किंवा चिक्की, राजगिरा लाह्या थेट दूधात भिजवून किंवा राजगिरा पिठाची भाकरी तुम्ही आहारात घेऊ शकता
राजगिरा हा फायबर चांगला स्त्रोत असल्यामुळे पचनक्रिया सुलभ होते तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते
राजगिरा खाल्याने बराचवेळ पोट भरलेले राहते व वारंवार खाण्याची इच्छा होत नाही परिणामी वजन नियंत्रात खूप मदत करते
राजगिऱ्यामध्ये गॅलिक ॲसिड आणि व्हॅनिलिक ॲसिडसारखे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील जळजळ कमी करून दीर्घकालीन आजारांपासून संरक्षण देतात.