पुढारी वृत्तसेवा
फुटबॉल विश्वातील सर्वात सुंदर महिला फुटबॉलपटू असेलेली स्वित्झर्लंडची स्टार खेळाडू अलीशा लेहमन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
आपल्या ग्लॅमरस लूकने जगभरातील चाहत्यांना घायाळ करणारी 'जगातील सर्वात हॉट फुटबॉलपटू' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २७ वर्षीय अलीशाने पुन्हा एकदा इंग्लंडच्या फुटबॉल मैदानात पुनरागमन केले आहे.
तिने 'लेस्टर सिटी विमेन' (Leicester City Women) या क्लबसोबत दोन वर्ष सहा महिन्यांचा महत्त्वपूर्ण करार केला आहे.
काही काळापूर्वी इटलीतील 'कोमो' क्लबकडून खेळणाऱ्या अलीशाने इंग्लंडमध्ये परतणे ही आपल्यासाठी घरवापसी असल्याचे म्हटले आहे.
या कराराबद्दल आनंद व्यक्त करताना ती म्हणाली, "हा अनुभव खरोखरच विलक्षण आहे. लेस्टर सिटी हा एक महत्त्वाकांक्षी क्लब असून महिला फुटबॉलला एका नव्या उंचीवर नेण्याचा त्यांचा मानस आहे. या प्रवासाचा भाग होताना मला अत्यंत आनंद होत आहे."
मैदानातील कामगिरीसोबतच अलीशा वैयक्तिक आयुष्यामुळेही सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
अलीशा आता 'लव्ह आयलँड' फेम मोंटेल मॅकेन्झीला डेट करत असल्याचे समोर आले आहे. मोंटेलने अलीशाच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे रोमँटिक फोटो शेअर करत या नात्यावर शिक्कामोर्तब केले.
अलीशा यापूर्वी ब्राझिलियन फुटबॉलपटू डग्लस लुईझसोबत रिलेशनशीपमध्ये होती, मात्र २०२२ मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर आता तिने आपल्या आयुष्यात नवीन सुरुवात केली आहे.
अलीशाने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण केले होते.