पुढारी वृत्तसेवा
फुटबॉल विश्वातील सर्वाधिक चर्चेत असलेली आणि आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी स्वित्झर्लंडची स्टार फुटबॉलपटू अलीशा लेहमन पुन्हा एकदा इंग्लंडच्या मैदानात परतली आहे.
जगातील सर्वात 'सेक्सी' फुटबॉलपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २७ वर्षीय अलीशाने लेस्टर सिटी विमेन क्लबसोबत दोन वर्ष सहा महिन्यांचा नवा करार केला आहे.
नुकतीच इटलीच्या 'कोमो' संघाकडून खेळणाऱ्या अलीशाने इंग्लंडमध्ये परतण्याला आपली 'घरवापसी' असे संबोधले आहे.
‘हा अनुभव खरोखरच अद्भुत आहे. लेस्टर हा एक उत्कृष्ट क्लब असून महिला फुटबॉलला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. या प्रवासाचा भाग होताना मला प्रचंड आनंद होत आहे,’ अशा भावना तिने व्यक्त केल्या.
केवळ फुटबॉलचे मैदानच नाही, तर अलीशाच्या वैयक्तिक आयुष्यानेही सध्या सोशल मीडियावर मोठी खळबळ उडवून दिली आहे.
अलीशा आता 'लव आयलंड' फेम स्टार मोंटेल मॅकेन्झीला डेट करत असल्याचे समोर आले आहे. मोंटेलने अलीशाच्या वाढदिवसानिमित्त काही रोमँटिक फोटो शेअर करून या नात्यावर शिक्कामोर्तब केले.
यापूर्वी अलीशा ब्राझिलियन फुटबॉलपटू डगलस लुईझसोबत रिलेशनशिपमध्ये होती, मात्र २०२२ मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला.
अलीशा लेहमनची लोकप्रियता केवळ मैदानापुरती मर्यादित नाही. इंस्टाग्रामवर तिचे १५.९ मिलीयन फॉलोअर्स आहेत.