Anirudha Sankpal
दारू पिणे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे, तरीही आजकाल पार्ट्यांमध्ये मद्यपान करणे ही एक फॅशन किंवा सवय बनली आहे.
दारू पिण्याबाबत कॅन्सर तज्ज्ञ डॉ. वर्तिका विश्वानी यांनी काही मोलाच्या टिप्स अन् काय काळजी घ्यावी याचा सल्ला दिला आहे.
१. 'बिंज ड्रिंकिंग' (Binge Drinking) टाळा
कमी वेळेत खूप जास्त प्रमाणात दारू पिण्याला 'बिंज ड्रिंकिंग' म्हणतात. असे केल्याने शरीरात 'एसिटलडिहाइड' (Acetaldehyde) नावाचे घातक रसायन तयार होते, जे ग्रुप १ कार्सिनोजेनिक आहे. यामुळे शरीरातील डीएनए (DNA) डॅमेज होतो.
२. दारू आणि स्मोकिंग एकत्र करू नका
दारू पिताना सिगारेट ओढणे (स्मोकिंग) अत्यंत धोकादायक ठरू शकते. या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यावर त्यांचा दुष्परिणाम दुप्पट होतो. या दोन्हीच्या एकत्र सेवनाने कर्करोगाचा धोका २१ पटीने जास्त वाढतो.
३. स्मोकिंगऐवजी 'वेप' (Vape) वापरणेही घातक
अनेक लोकांना असे वाटते की 'वेप' किंवा ई-सिगारेट ही साध्या सिगारेटपेक्षा कमी हानिकारक आहे. परंतु, आरोग्याच्या दृष्टीने दोघांचाही घातक परिणाम सारखाच होतो, त्यामुळे वेपिंग करणे देखील टाळावे.
४. रिकाम्या पोटी दारू पिणे टाळा
कधीही रिकाम्या पोटी मद्यपान करू नये. पोट रिकामे असताना दारू पिल्यास शरीराद्वारे अल्कोहल शोषून घेण्याचा वेग (Absorption) खूप वाढतो, ज्यामुळे डीएनए डॅमेज होण्याचा धोका अधिक तीव्र होतो.
५. वेगवेगळे ड्रिंक्स एकत्र मिक्स करू नका
पार्टीमध्ये अनेक प्रकारचे अल्कोहोलिक ड्रिंक्स एकत्र मिक्स करून पिणे टाळावे. असे केल्याने शरीरात कार्सिनोजेनिक घटक वेगाने वाढतात, जे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात.