Namdev Gharal
सौदी अरेबियाच्या वाळवंटात असलेला 'अल नस्ला रॉक' (Al Naslaa Rock) हे जगातील सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक मानले जाते.
हा एक मोठ्या आकाराचा दगड असून हा मधोमध कापला आहे याचा काप इतका अचूक आहे की पाहणाऱ्याला वाटते की हे काम एलियन्सनी लेझर सारख्या अत्याधुनिक हत्याराने केले असावे.
सौदी अरेबियातील तायमा ओएसिस (Tayma Oasis) मध्ये हा अवाढव्य दगड आहे, जो मधोमध अगदी सरळ कापला गेला आहे.
या दगडाचे दोन भाग झाले आहेत, पण त्यांच्यामधील रेषा इतकी सरळ आणि समांतर आहे की जणू काही एखाद्या प्रगत लेझरने किंवा यंत्राने तो कापला असावा.
सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या दगडाचे दोन्ही अवाढव्य भाग दोन अतिशय लहान नैसर्गिक पायांवर वर्षानुवर्षे अगदी स्थिर उभे आहेत. त्यांचा आजतागायत तोल गेलेला नाही
या दगडामध्ये केवळ नैसर्गिक सौंदर्यच नाही, तर हजारो वर्षांपूर्वीची चित्रे देखील कोरलेली आहेत. यात घोडा आणि मानवाच्या आकृत्या स्पष्टपणे दिसतात.
वैज्ञानिकांच्या मते जमिनीच्या हालचालींमुळे दगडात भेग पडली असावी किंवा वाऱ्यामुळे होणाऱ्या झीज प्रक्रियेमुळे हा आकार तयार झाला असावा.
काही लोक असाही दावा करतात की प्राचीन काळी प्रगत तंत्रज्ञान असलेल्या एलियन्सनी हा दगड कापला असावा. अर्थात, विज्ञानाकडे याचे ठोस पुरावे नाहीत.
आज हा दगड पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक आणि फोटोग्राफर सौदी अरेबियात येतात