सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक.वजन हा मुद्दा करियरच्या आड येत नाही हे तिने या मालिकेतून सिद्ध केले.या मालिकेनंतर अक्षया कुठे दिसली नाही.पण आता ती तब्बल दोन वर्षांनंतर मालिकेत परत येते आहे.सन मराठीवरील कॉन्स्टेबल मंजू या मालिकेत ती दिसणार आहे.मंजूच्या आयुष्यात येणार वादळ असे या प्रोमो व्हीडियोवर लिहिले आहे.तिच्या या कमबॅकचे तिचे फॅन्स आणि सहकालाकरांनी तिचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या आहेत