Aishwarya Rai | अखेर ऐश्वर्याने Cannes मध्ये ठेवले पाऊल, गाऊन बनवायला लागले तब्बल १५०० तास

स्वालिया न. शिकलगार

ऐश्वर्या राय कान्स मध्ये जाणार की नाही, अशी चर्चा सुरु असताना ती कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली

ऐश्वर्याने सुंदर डार्क सी ब्ल्यू कलर गाऊन परिधान केला होता

ती रेड कार्पेटवर उतरताच कॅमेरामन्सनी आपल्या नजरा तिच्याकडे वळवल्या

मोहित रायने ऐश्वर्याची स्टाईल केली, सुंदर डायमंड नेकलेस, बोल्ड स्टेटमेंट रिंग्ज तिने घातली

सॉफ्ट मेकअप, डिफाईंड बोल्ड आईज, रोजी लिप्स, लांब केस असा तिचा रॉयल लूक ठरला

अग्रवाल सिग्नेचर “क्रिस्टल वेन” एम्ब्रॉयडरीमध्ये हा क्रिस्टल वर्क गाऊन बनवण्यासाठी १५०० तासांहून अधिक वेळ लागला

२३ मे रोजी कान्सची क्लोजिंग सेरेमनी आहे, २२ मे लाच कान्समध्ये एन्ट्री घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला

रेड कार्पेटवर येताच तिने फ्लाईंग किस देऊन नमस्ते म्हटले