Namdev Gharal
आपण पाहतो की ८ हजार मिटर उंचीच्या पर्वंतांची शिखरे ही बर्फाच्छादीत असतात. पण त्याही पेक्षा उंचीवरुन प्रवास करुनही विमानांवर बर्फ का साचत नाही
पर्वतांवरील ढग साधारणपणे ८,००० ते १०,००० मीटर उंचीपर्यंत असतात. या ढंगामध्ये असलेले बाष्प (Moisture) सहजपणे एवढ्या उंचीवरील व स्थिर असलेल्या पर्वतांवर बर्फ पडतो.
तसेच विमान सरासरी ३० ते ४० हजार फटांवर उड्डाण करते. 'स्ट्रॅटोस्फिअर' (Stratosphere) या वातावरणाच्या थरात उडतात या वातावरणात मुळात ढगच नसतात, ते ढगांच्या वरुन प्रवास करते परिणामी बर्फ साचण्याची शक्यता नसते
टेक-ऑफ किंवा लँडिंग करताना विमान जेव्हा खालच्या थरातील ढगांमधून जाते, तेव्हा विमानाचे पंख (Wings) आणि इंजिनवर बर्फ साचण्याचा धोका असतो.
यासाठी विमानांमध्ये एंटी-आइसिंग सिस्टीम असते. इंजिनची गरम हवा किंवा पंखांमधील हीटिंग एलिमेंट वापरून साचलेला बर्फ त्वरित वितळवला जातो.
हवेत बाष्प (Moisture) नसते : बर्फ तयार होण्यासाठी हवेत पाणी किंवा बाष्प असावे लागते. विमाने ज्या उंचीवर उडतात, तिथे हवा अत्यंत कोरडी असते. बाष्प नसल्यामुळे तिथे पाऊस किंवा बर्फ तयार होऊ शकत नाही.
विमान ज्या उंचीवर उडते, तिथे तापमान -४०°C ते -५०°C पर्यंत खाली जाते. परंतु बर्फ पडण्यासाठी फक्त थंडी पुरेशी नसते, तर पाण्याचे थेंब गोठणे गरजेचे असते. बाष्पाअभावी तिथे केवळ कोरडी आणि थंड हवा असते.
प्रवासी विमाने ताशी ८०० ते ९०० किमी वेगाने धावतात. या प्रचंड वेगामुळे हवेचा विमानावर जो घर्षण दाब निर्माण होतो, त्यामुळे विमानाची बाह्य त्वचा हलकी गरम राहते. यामुळे बर्फाचे कण विमानावर टिकू शकत नाहीत.