पुढारी वृत्तसेवा
आपण मोबाईलवर एक प्रश्न विचारतो आणि काही सेकंदात AI उत्तर देतं; पण या 'स्मार्ट' तंत्रज्ञानामुळे पर्यावरणाची मोठी किंमत मोजावी लागत आहे.
नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार, AI सिस्टिम्स वर्षाला संपूर्ण जगात वर्षभरात वापरल्या जाणाऱ्या बाटलीबंद (Bottled Water) पाण्यापेक्षाही जास्त पाणी वापरत आहे!
AI चालवण्यासाठी अवाढव्य डेटा सेंटर्स लागतात. हे सर्व्हर रात्रंदिवस चालताना प्रचंड गरम होतात. त्यांना थंड ठेवण्यासाठी लाखो लिटर पाण्याची गरज भासते.
AI वर्षाला ३०० ते ७०० अब्ज लिटर पाणी फस्त करू शकतं.आपण ज्याला तंत्रज्ञानाचं भविष्य मानतोय, तेच भविष्य आता पाणी टंचाईचं संकट अधिक गडद करतंय.
AI ची पाण्याची वार्षिक गरज जगातील बाटलीबंद पाण्याच्या वापरापेक्षा जास्त आहे.
हा आकडा ७०० अब्ज लिटरपर्यंत पोहोचू शकतो.
पाण्यासोबतच प्रचंड वीजवापरामुळे कार्बन उत्सर्जनातही मोठी वाढ होत आहे.
आपण पुढच्या पिढीचं पाणी वापरून हे तंत्रज्ञान विकसित करत आहोत का? हा प्रश्न आता प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.