AI हेल्थ मॉनिटरिंग: आरोग्य क्षेत्रातील नवी क्रांती!

Namdev Gharal

आजकालच्या धावपळीच्या युगात ‘फिट’ राहणे ही गरज आहे. सध्या विकसीत देशात AI health monitoring चा वापर होतो. ही संकल्पना समजून घेवू.

AI हेल्थ मॉनिटरिंग म्हणजे 'कृत्रिम बुद्धिमत्तेचा' (AI) वापर करून तुमच्या शरीरातील बदलांवर २४ तास लक्ष ठेवणे

हे काम कसे करते : तुमचे स्मार्टवॉच, फिटबिट असे ॲप किंवा फोनमधील सेन्सर्स तुमचा डेटा ( उदा. हृदयाचे ठोके, किती पावले चालला, किती वेळ झोपता ) गोळा करतात आणि AI त्याचे विश्लेषण करते.

AI तुमच्या हृदयाच्या गतीमधील अगदी बारीक बदलही टिपते. काही असामान्य आढळल्यास ते तुम्हाला त्वरित 'अलर्ट' देते, यामुळे हृदयविकाराचा झटका टाळता येऊ शकतो.

अजून एक म्हणजे तुम्ही किती वेळ गाढ झोपलात? तुमची झोप पूर्ण झाली का? हे सर्व AI मुळे अचूक कळते, ज्यामुळे तुम्ही तुमची दिनचर्येत बदल करु शकता किंवा योग्य विश्रांती घेऊ शकता

मधुमेहाच्या पेशंटसाठी AI वर आधारित ॲप,उपकरणे रक्तातील साखरेची पातळी सतत तपासत राहतात आणि आहारात काय बदल करायला हवेत हे सुचवतात

AI मधील सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे त्‍याकडे जुन्या डेटाचे विश्लेषण करण्याची क्षमता असते. त्यामुळे एखादा मोठा आजार उद्भवण्यापूर्वीच त्याची लक्षणे ओळखून AI तुम्हाला सावध करू शकते.

जर तूम्ही डॉक्टरकडे गेलात तर रुग्णाचा २४ तासांचा रिपोर्ट AI कडे तयार असतो. यामुळे डॉक्टरांना अचूक निदान करणे आणि योग्य उपचार सुचवणे सोपे जाते.

ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, नोकरदार, डायबेटीक पेशंट, हार्ट पेशंट यांच्यासाठी AI हेल्थ मॉनिटरींग वरदान ठरू शकते

फिटबीट, ॲपल वॉच, ऑरा रिंग ही उपकरणे तुमच्या मनगटावर, बोटामध्ये परिधान केलेली असतात आणि ती सहजरित्‍या कॅरी करता येतात त्‍यामुळे खूप उपयुक्त ठरु शकतात.