AI Brain Tumor Surgery : ‘एआय’च्या मदतीने मेंदूतील ट्यूमरची यशस्वी शस्‍त्रक्रिया

पुढारी वृत्तसेवा

वैद्यकीय जगतात नवा इतिहास!

लंडनच्या ‘नॅशनल हॉस्पिटल फॉर न्यूरोलॉजी अँड न्यूरोसर्जरी’मध्ये पार पडली जगातील पहिली थेट ‘एआय’ असिस्टेड ब्रेन सर्जरी.

काय होती रुग्णाची समस्या?

४८ वर्षीय रीस हिबर्ट यांच्या मेंदूतील पिट्युटरी ग्रंथीवर ११ मिमी आकाराची ट्यूमरची अत्यंत गुंतागुंतीची गाठ झाली होती.

डोळ्यांवर ओढवले होते मोठे संकट

ही गाठ थेट दृष्टी देणाऱ्या नसांवर तीव्र दाब टाकत असल्याने रुग्णाची दृष्टी हळूहळू कमी होत होती आणि कायमचे अंधत्व येण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे संशोधन

या आव्हानात्मक शस्त्रक्रियेसाठी 'युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन'च्या संशोधकांनी विशेष ‘एआय’ (AI) सॉफ्टवेअर विकसित केले होते.

रिअल-टाईम लाईव्ह मार्गदर्शन

शस्त्रक्रियेदरम्यान एंडोस्कोपी कॅमेऱ्यातून येणाऱ्या थेट व्हिडिओ फीडचे एआय तंत्रज्ञानाने एका सेकंदाच्या आत अचूक विश्लेषण केले.

'कलर कोडिंग'चा अचूक खेळ

मेंदूतील अत्यंत सूक्ष्म रक्तवाहिन्या, नसा आणि ऊती (Tissues) सुरक्षित ठेवण्यासाठी एआयने स्क्रीनवर वेगवेगळ्या रंगांच्या साहाय्याने स्पष्ट फरक दाखवला.

डॉक्टरांना मिळाले अचूक संकेत

कोणत्या भागावर शस्त्रक्रिया करावी आणि कोणत्या संवेदनशील भागाला अजिबात स्पर्श करू नये, याचे थेट मार्गदर्शन दुसऱ्या स्क्रीनवर न्यूरोसर्जनला मिळत होते.

गाठ काढण्यात डॉक्टरांना १००% यश

एआयच्या अचूक व्हिज्युअल गाईडन्समुळे डॉक्टरांनी कोणताही धोका न पत्करता मेंदूतील ट्यूमर यशस्वीरीत्या पूर्णपणे काढून टाकला.

शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाली असून रुग्णाची दृष्टी वाचवण्यात डॉक्टरांना यश आले आहे; आधुनिक वैद्यकशास्त्रात ही एक नवी क्रांती ठरली आहे.