AI ची कमाल: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गरीब असती, तर ते कसे दिसतील....

अमृता चौगुले

अनेक AI आर्टिस्टनी कल्पना ना करू शकणाऱ्या इमेजेस तयार करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

आता एका आर्टिस्टने  AI चा वापर जगातील सर्वात श्रीमंत लोकांची गरीब म्हणून पुनर्कल्पना करण्यासाठी केला आहे.

AI आर्टिस्ट गोकुळ पिल्लई यांनी सात इमेजेस शेअरकेल्या आहेत, ज्यामध्ये अब्जाधीश झोपडपट्टीत राहत असल्यास ते कसे दिसतील हे दाखवले आहे.

 या इमेजेसमध्ये डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स, मुकेश अंबानी, मार्क झुकरबर्ग, वॉरेन बफेट, जेफ बेझोस आणि एलॉन मस्क आहेत.

या सर्व फोटोंना कॅप्शन दिले आहे, ''स्लमडॉग मिलियनेअर्स.

या AI इमेजेस इतक्या वास्तववादी वाटतात की, त्यांना वास्तविक प्रतिमांपासून वेगळे करणे कठीण आहे.