घरात ठेवा ही रोपे, तणाव होईल कमी, आरोग्य राहील उत्तम

निलेश पोतदार

agriculture best indoor plants for home air purifier

काही झाडे घराचे वातावरण शुद्ध ठेवतात. मन शांत ठेवण्यास मदत करतात. ही रोपे नकारात्‍मकता कमी करून सकारात्‍मक ऊर्जा आणतात.

मनी प्लांट

सकारात्‍मक ऊर्जेसाठी आणि घरातली हवा स्वच्छ ठेवण्यासाठी घरातील तणाव कमी करण्यासाठी मदत करते.

पीस लिली

वातावरण शांत ठेवण्यास मदत करते. विषारी हवा कमी करण्याचे काम करते.

स्नेक प्लांट

रात्रीही ऑक्सिजन पुरवतो. नकारात्‍मक उर्जेला शोषून घेतो.

एरेका पाम

वातावरण संतुलित आणि सुखद बनवते. हवेत गारवा ठेवून अल्हाददायक ठेवते.

एलोवेरा

हवेतील प्रदूषित घटकांना दूर करते. नकारात्‍मक घटकांना शोशुन घेण्यास मदत करते.

तुळस

तुळस ही भारतीय संस्कृतीत महत्‍वाचे मानले गेले आहे. यामुळे वातावरण शुद्ध राहते. ते मांगल्याचे प्रतीक आहे.

झाडे किंवा रोपे ही घरातील वातावरण अल्हाददायक ठेवतात. मनाला ताजे ठेवतात. तसेच डोळ्यालाही सुखद गारवा देण्याचे काम करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.