Weight Loss Injection : वजन कपातीच्या स्वस्त इंजेक्शनचा मार्ग मोकळा

पुढारी वृत्तसेवा

स्थूलतेविरुद्धच्या लढ्यात मोठा बदल घडवणारी घडामोड घडली आहे.

वजन कपातीसाठी वापरल्या जाणाऱ्या सेमाग्लुटाईड या औषधाचे पेटंट भारतात संपल्यामुळे आता त्याच्या स्वस्त जेनेरिक आवृत्त्या लवकरच बाजारात येणार आहेत.

आतापर्यंत महागड्या असल्याने मर्यादित लोकांपुरतीच उपलब्ध असलेली ही उपचारपद्धती आता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

मुंबईतील डॉक्टरांच्या मते, सध्या दर आठवड्याला अनेक रुग्ण वजनकपातीच्या इंजेक्शनसाठी येत असून जेनेरिक औषधे आल्यानंतर ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते.

सध्या दरमहा 15 ते 22 हजार रुपये खर्च येत असला तरी जेनेरिकमुळे तो सुमारे 5 हजारांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

भारतात 24 टक्के महिला आणि 23 टक्के पुरुष स्थूल किंवा जादा वजनाचे आहेत.

त्यामुळे स्वस्त औषधांमुळे उपचार अधिक व्यापक होतील.

मात्र, या औषधांमुळे मळमळ आणि पचनासंबंधी त्रास होऊ शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.