स्वालिया न. शिकलगार
स्टार प्रवाहवरील ‘आनंदी’ मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे
कथेला नवं वळण देणारी शलाका ही व्यक्तिरेखा लवकरच भेटीला येणार आहे
अभिनेत्री सई रानडे ही व्यक्तीरेखा साकारणार आहे. तिच्या एन्ट्रीमुळे मालिका नाट्यमय वळण घेईल
शलाका ही उद्योगपती युगंधर निंबाळकर यांची मेहुणी. समिधा ही तिची जुळी बहिण
युगंधरची पत्नी समिधा व शलाकाचे स्वभाव भिन्न. शलाका उथळ, रूपाचा, पैशाचा अभिमान मिरवणारी
युगंधरने समिधाची पत्नी म्हणून निवड केली, याची सल शलाकाच्या मनात आहे
युगंधरला नेस्तनाबूत करणं हाच तिच्या आयुष्याचा उद्देश आहे
जोवर युगंधर संपत नाही तोवर अंगावर कुठलाच रंग चढवणार नाही हे शलाकाने ठरवलंय