मराठमोळा लूक अन् नाकात नथ, साखरपुड्यानंतर खुललं अमृताचं रूपडं

अनुराधा कोरवी

अमृताने नुकतेच गुपचूप पद्धतीने अभिनेता प्रसाद जवादेसोबत साखरपुडा उरकलाय.

दरम्यान अमृताने गुलाबी- केसरी कलरची साडी परिधान करत मराठमोळा लूक शेअर केलाय.

या साडीवर तिने गुलाबी कलरचे स्लिव्हलेस ब्लॉऊज परिधान केलं आहे.

गुपचूप साखरपुडा उरकल्यानंतर अमृताच्या चेहऱ्यावर ग्लो दिसून आलाय.

मोकळे केस, गळ्यात हार, इअररिग्स, नाकात नथ, कपाळावर टिकली, बांगड्या- अंगठी, मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय.

अमृताच्या सौंदर्याचे चाहते दिवाने झालेत.

अमृता-प्रसादचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात १८-११- २३ रोजी पार पडणार आहे.

मनमोहक अंदाजाने तिच्या सौंदर्यांत आणखी भर घातलीय.