जीवघेण्या ऍसिडिटीवर घरगुती उपाय- Acidity Home Remedy

अंजली राऊत

लिंबू तीव्र Acidity होत असल्यास एक  ग्लास पाण्यामधे अर्धे लिंबू पिळून त्यात अर्धा छोटा चम्मच मीठ टाकून एकत्र करा. हे पाणी पिल्यास Acidity वर त्वरित  आराम मिळेल..

थंड दूध रात्री गॅस किंवा एसिडटी (Acidity) झाल्यास एक ग्लास थंड दुध साखर न घालता प्या. थंड दुध पिल्याने तत्काळ आराम मिळेल..

ओवा जेवणामध्ये ओव्याचा वापर करा. भाजी किंवा पोळी मधे चिमुटभर ओवा घातल्यास ते पचण्यास सोपे जाते व यामुळे पोटातील आम्ल वाढत नाही..

बेकिंग सोडा अर्धा चमचा बेकिंग सोडा एका ग्लास पाण्यात मिसळून प्या. बेकिंग सोडा पोटातील गॅस कमी करण्यास मदत करतो..

अदरक आल्यामध्ये Acidity विरोधी नैसर्गिक गुणधर्म असतात जे पचनसंस्थेला शांत करण्यास मदत करतात. 

बडीशेप जेवणानंतर एक चमचा बडीशेप चघळल्याने Acidity  कमी होण्यास मदत होते. बडीशेप मध्ये वातवर्धक गुणधर्म असतात जे पचनास मदत करतात

कोरफड रस कोरफडचा रस पोटातील पित्ता वर थंड प्रभाव करते आणि आम्लता कमी करण्यासाठी मदत करते. जेवणापूर्वी एक चतुर्थांश कप शुद्ध कोरफडीचा रस थोड्या प्रमाणात प्यावां.