Acidity: जेवल्यानंतर पित्ताचा त्रास होतोय? १० मिनिटांत जळजळ थांबवण्यासाठी 'हे' उपाय करा

पुढारी वृत्तसेवा

जेवल्यानंतर छातीत जळजळ आणि पित्ताचा त्रास होत असेल तर या सोप्या उपायांनी आराम मिळेल.

जेवण झाले की घशाशी येणे, आंबट ढेकर आणि मळमळ होणे या सामान्य समस्या असून यालाच 'अॅसिड रिफ्लेक्स' म्हणतात.

Acidity

जेव्हा जठरातील आम्ल अन्ननलिकेकडे उलटे सरकते, तेव्हा छातीत जळजळ होऊ लागते.

Acidity | file photo

चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती पित्ताला निमंत्रण देतात. यासाठी आजच या ३ सवयी बदला!

Acidity | Acidity

जेवल्याबरोबर लगेच झोपू नका अन्यथा आम्ल वर येते. जेवण आणि झोप यामध्ये किमान २ ते ३ तासांचे अंतर ठेवा.

जेवण झाल्यावर लगेच बसून न राहता १०-१५ मिनिटे हळू चाला (शतपावली). यामुळे अन्न पचनास मदत होते.

घाईघाईत जेवू नका. अन्नाचा प्रत्येक घास व्यवस्थित चावून खाल्ल्यास पचन सुलभ होते.

जास्त तळलेले, मसालेदार पदार्थ आणि फास्ट फूड खाणे टाळा. हे पदार्थ पचायला जड असतात आणि पित्त वाढवतात.

आहारात सुंठ, ओवा आणि जिरे यांचा समावेश करा. जेवणानंतर बडीशेप किंवा आवळा सुपारी खाणे अत्यंत फायदेशीर ठरते.