पुढारी वृत्तसेवा
वास्तुशास्त्रानुसार, 7 घोड्यांचा फोटो समृद्धी, शक्ती, साहस आणि प्रामाणिकतेचे प्रतीक मानले गेले आहे.
घरात पळणाऱ्या 7 घोड्यांचा फोटो लावल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. नवीन घर किंवा ऑफिस घेतल्यास असा फोटो लावणे शुभ मानले जाते.
घरात सुख समृद्धी येते. तसेच सर्व वास्तु दोष दूर होतात, उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतात. पूर्व किंवा उत्तर दिशा ही सात घोड्यांच्या फोटोसाठी सर्वोत्तम मानली जाते.
सात हा आकडा सर्वांसाठी शुभ असतो. तो अशुभ फळ देत नाही. आकाशात दिसणाऱ्या इंद्रधनुष्याचे सात रंग, सप्तर्षी, त्या बरोबर लग्नात सात फेरे घेतले जातात. सात हा आकडा प्राकृतिक व सार्वभौमिक आहे.
पांढरे घोडे सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहेत. हे चित्र कुठेही लावले तरी लक्षात ठेवा की त्यात घोडे पांढरे आहेत. यामुळे घर आणि ऑफिसमधील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते.
7 घोड्यांचा फोटो पूर्व दिशेला लावावा. त्यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरात नेहमी पैशाची चढउतार जाणवत असेल तर सात घोड्यांचा फोटो जरूर लावावा. यामुळे आर्थिक स्थिरता येते.
फोटो लावताना एक काळजी घ्यावी, ती म्हणजे घोड्याचा चेहरा आतल्या बाजूला असावा. त्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतात. व्यक्तीची व्यापार-व्यवसायात प्रगती होते. पैशाची कधीच चणचण भासत नाही.
पांढरे घोडे हे ऊर्जेचे प्रतीक मानले जातात. फोटो लावताना विशेष काळजी घ्यायला हवी. घोड्याचा अर्धवट फोटो लावू नये. असे फोटो लावणे अशुभ मानले जाते.घरातील खोली आणि ऑफिसच्या हिशोबाने मध्यम आकारातील फोटो तुम्ही घरात लावू शकता.
ही माहिती सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. जी वाचकांपर्यंत पोहोचवणे इतकाच हेतू आहे.