पुढारी वृत्तसेवा
सध्या वाढत्या उष्म्यामुळे घराघरांत AC चा वापर वाढला आहे. मात्र, योग्य खबरदारी न घेतल्यास हे उपकरण जीवघेणे ठरू शकते.
AC मध्ये आग लागण्याची प्रमुख कारणे आणि त्यापासून बचाव करण्याचे उपाय काय आहेत, हे जाणून घेणे गरजेचे आहे.
१) इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट
अनेक तास सलग AC सुरू ठेवल्यामुळे वायरिंग गरम होते. जर वायरिंग हलक्या दर्जाचे असेल किंवा कनेक्शन सैल असेल, तर शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची शक्यता असते.
उपाय: नियमित सर्व्हिसिंगसोबतच इलेक्ट्रिशियनकडून वायरिंग तपासून घेणे आवश्यक आहे.
२) व्होल्टेजमधील चढ-उतार
विजेचा दाब वारंवार कमी-जास्त झाल्यामुळे AC च्या अंतर्गत भागांवर ताण येतो आणि ते जळू शकतात. ही आग वेगाने संपूर्ण घरात पसरू शकते.
उपाय: यापासून बचावासाठी चांगल्या कंपनीचा 'स्टॅबिलायझर' वापरणे अनिवार्य आहे.
३) धूळ आणि घाण साचणे
AC च्या कंडेन्सर आणि फिल्टरमध्ये धूळ साचल्यास हवा खेळती राहत नाही. यामुळे मशीन प्रमाणाबाहेर गरम होऊन स्फोट होऊ शकतो.
उपाय: वेळोवेळी फिल्टर साफ करणे आणि एअरफ्लो सुरळीत ठेवणे आवश्यक आहे.
४) हलक्या दर्जाचे सुटे भाग
अनेकदा पैसे वाचवण्यासाठी AC दुरुस्त करताना स्वस्त किंवा बनावट पार्ट्स वापरले जातात. हे पार्ट्स उष्णतेमुळे लवकर वितळतात आणि आगीचे कारण ठरतात.
उपाय: दुरुस्तीसाठी नेहमी अधिकृत पार्ट्सचाच वापर करावा.
५) चुकीची इन्स्टॉलेशन प्रक्रिया
अननुभवी मेकॅनिककडून AC बसवून घेतल्यास तांत्रिक त्रुटी राहू शकतात, ज्या भविष्यात धोकादायक ठरतात.
उपाय: शक्यतो कंपनीच्या प्रशिक्षित तंत्रज्ञाकडूनच AC बसवून घ्यावा किंवा त्याची देखभाल करावी.