Abhishek Sharma : अभिषेक शर्माने मोडला मोहम्मद रिझवानचा विक्रम

पुढारी वृत्तसेवा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने 37 चेंडूंत 68 धावा केल्या.

त्याने 8 चौकार आणि 2 षटकार मारले.

या कामगिरीसह अभिषेक शर्माने पाकिस्तानी यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवानचा विक्रम मोडला.

रिझवान हा सलामीवीर म्हणून एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू होता.

रिझवानने 2021 मध्ये 42 षटकार मारले होते.

तर अभिषेकने 2025 मध्ये आता 43 षटकार मारले. त्याच्या या कामगिरीने एक नवा विक्रम घडवला आहे.

या यादीत तिस-या क्रमांकावर न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल आहे.

41 षटकार (2021)

चौथ्या स्थानी वेस्ट इंडिजचा एविन लुईस आहे.

37 षटकार (2021)

पाचव्या नंबरवर न्यूझीलंडचा कॉलिन मुनरो आहे.

35 षटकार (2018)