अंजली राऊत
आषाढ महिना सुरु झाला की, या दिवसात जास्तीज जास्त तळणीचे पदार्थ खाल्ले जातात.
आषाढ महिन्यात कधीही तुम्ही मस्त तळलेले पदार्थ खाऊ शकता. आषाढात तळलेले पदार्थ खाणे यालाच 'आषाढ तळणे' असे म्हणतात.
Pudhari photo आषाढ महिन्यात वेगवेगळे पदार्थ बनवण्याची पद्धत आहे. खास या दिवशी मुलीला व जावयाला घरी बोलावून चमचमीत पदार्थांचा मान दिला जातो.
आषाढ महिन्यात आषाढ तळण्याची पद्धत जरी असली तरी या दिवसात तेलकट पदार्थ का खाल्ले जातात याचेही खास कारण आहे.
आषाढ महिन्यात पाणी प्रदूषित झाल्याने पाण्यातून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराला वंगण मिळावे यासाठीही तेलकट पदार्थांचे सेवन केले जाते.
तेलकट आणि गरम पदार्थ हे शरीराला या काळात गरम ठेवण्याचे काम करत असतात. त्यामुळेच या काळात पदार्थ तळले जातात.
पावसात अनेकदा चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. उन्हाळ्यामध्ये घरात पापड, लोणची अशी बनवलेली असतात. त्यामुळे बाहेर न खाता घरचे पदार्थ खाण्यासाठी तळणीचे पदार्थ केले जातात.
आषाढ महिन्यात चयापचय क्रिया चांगली असते. त्यामुळेही असे पदार्थ खाल्ले जातात.
पूर्वीच्या काळी वधूला सासरी चांगले चमचमीत पदार्थ मिळत नसायचे. तिला काहीतरी चांगले खायला मिळावे यासाठी अशाप्रकारे पदार्थ आषाढ तळला जायचा.
पूर्वजांच्या दृष्टीकोनातून पावसाळा आणि आरोग्य या सगळ्या गोष्टी लक्षात घेत आषाढ महिन्यात आषाढ तळला जातो. आषाढात विदर्भामध्ये रसीशीत दावत, काकडीचे धापोडे आणि तांदुळमेथ्यांची बोंड खाल्ली जातात.