Namdev Gharal
९० च्या दशकातील एक सुंदर अभिनेत्री म्हणून ती परिचित आहे.
सोनाली बेंद्रेने मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात केली व चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली.
लोभसवाना चेहरा लाभलेली सोनाली नेहमीच लाईम लाईटमध्ये राहीली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत तिचा एक वेगळा चाहतावर्ग आहे.
२०१८ मध्ये कॅन्सरसारख्या आजारावर मात करुन ती पूर्णपणे बरी झाली आहे.
तिच्या या प्रवासाने अनेकांना प्रेरणा दिली आहे.
आज तिने जरी वयाची ५० गाठली असली तरी तीचा चार्म आजही टिकून आहे.
तिने इन्स्टावर शेअर केलेले फोटो पाहून तीच्यासाठी ‘वय‘ थांबले आहे असाच भास होतो.
सध्या ती चित्रपटात दिसत नसली तरी रिॲलिटी शोमधून प्रेक्षकांना भेटत असते.