Toran Vastu Tips : आंब्याच्या पानांच्‍या तोरणात किती पाने असावीत?

पुढारी वृत्तसेवा

वास्तुशास्त्रानुसार, घरात सकारात्मक ऊर्जा आणि तोरण याचा थेट संबंध आहे.

कोणताही उत्सव, मंगल कार्य, समारंभ असो आपल्याकडे आंब्याच्या पानांचे तोरण लावण्याची पद्धत आहे.

दिवाळीत घराच्‍या मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांच्‍या तोरण लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते, अशी मान्यता आहे.

लोक सहसा कृत्रिम आणि डिझायनर तोरण घराच्या मुख्य दरवाज्यावर लावायला प्राधान्य देतात.

सणासुदीच्या काळात घरामध्ये आंब्याच्या पानांचे तोरण लावणार असाल, तर त्यासंबंधीचे फायदे जाणून घ्या.

सणांमध्ये आंब्याच्या पानांचे तोरण लावणे शुभ मानले जाते. त्याची ऊर्जा अत्यंत सकारात्मक असते.

आंब्याच्या पानांचे तोरण घरात लावल्‍याने सर्व सदस्य निरोगी आणि समृद्ध राहतात.

वास्तुशास्त्रानुसार, तोरणामध्ये ५, ७, ११ आणि २१ आंब्याची पाने लावणे शुभ मानले जाते.

तोरणासंबंधी अनेक नियमही आहेत. त्‍यापैकी पाने सुकताच तोरण त्वरित काढून टाकावे.

टीप: ही माहिती केवळ मार्गदर्शन म्हणून विचारात घ्यावी. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

येथे क्‍लिक करा.