पुढारी वृत्तसेवा
आधार ॲपद्वारे तुमची वैयक्तिक माहिती जसे की मोबाईल नंबर, पत्ता, बँक लिंकिंग तपशील किंवा बायोमेट्रिक माहिती चुकीच्या हातात पडू शकते.
आधार ॲप वापरताना होणाऱ्या छोट्या चुका तुमच्या वैयक्तिक माहितीला धोक्यात आणू शकतात.
डेटा लीक होण्यास कारणीभूत ठरू शकणाऱ्या अशा ५ मोठ्या चुका कोणत्या आहेत आणि आपले आधार व बँक खाते कसे सुरक्षित ठेवावे, हे जाणून घेऊया.
सायबर गुन्हेगार हुबेहूब मूळ ॲपसारखी दिसणारी बनावट ॲप्स तयार करतात. ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्याचे रिव्ह्यू आणि डाउनलोडची संख्या नक्की तपासा. कोणत्याही अनोळखी लिंकवरून ॲप डाउनलोड करू नका.
समोरची व्यक्ती स्वतःला बँक अधिकारी किंवा सरकारी कर्मचारी सांगत असली, तरी कधीही आपला OTP कोणाला देऊ नका.
रेल्वे स्टेशन, मॉल किंवा कॅफेमधील फ्री (Public) WiFi वर आधार ॲप लॉगिन करणे सुरक्षित नसते. मोबाईल डेटाचा वापर करा. सार्वजनिक WiFi वर लॉगिन करणे टाळा.
तुमच्या फोनला पासवर्ड, फिंगरप्रिंट किंवा फेस लॉक नसेल आणि फोन हरवला, तर कोणीही तुमचे आधार ॲप उघडू शकते. त्यामुळे आधार ॲपसाठी नेहमी मजबूत स्क्रीन लॉक आणि ॲप लॉकचा वापर करा.
आधारमध्ये बायोमेट्रिक लॉकची सुविधा असते. हे लॉक बंद असेल, तर तुमच्या फिंगरप्रिंटचा गैरवापर होऊ शकतो. आधारच्या अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवर जाऊन बायोमेट्रिक लॉक सुरू करा.