Summer Curd Tips | दही विरजताना जुने विरजण वापरताय? सावधान! उन्हाळ्यात दही टिकवण्यासाठी फॉलो करा हे नियम

पुढारी वृत्तसेवा

दही लवकर आंबट का होते?
उन्हाळ्यात उष्णतेमुळे दही पटकन आंबट होते आणि त्याचा स्वाद बदलतो.

थंड जागेत ठेवा
दही नेहमी फ्रिजमध्ये ठेवल्यास ते जास्त वेळ ताजे राहते.

मातीच्या भांड्याचा वापर करा
मातीच्या भांड्यात ठेवलेले दही थंड राहते आणि आंबटपणा कमी होतो.

curd & food combinations

उकळलेले दूध वापरा
दही बनवताना उकळलेले आणि थंड केलेले दूध वापरल्यास चांगले सेट होते.

Cow Milk | Pudhari

जुने दही कमी वापरा
जास्त जुने दही लावल्यास दही लवकर आंबट होते, त्यामुळे ताजे स्टार्टर वापरा.

साखर किंवा पाणी टाळा
दही सेट झाल्यावर त्यात पाणी किंवा साखर मिसळू नका, त्यामुळे चव बदलते.

Sugar Withdrawal Effects | Canva

झाकण नीट लावा
भांडे नीट झाकून ठेवल्यास बाहेरील उष्णता आणि हवा आत जात नाही.

वेळेवर फ्रिजमध्ये ठेवा
दही सेट झाल्यानंतर लगेच फ्रिजमध्ये ठेवणे महत्त्वाचे आहे.

curd at night | File Photo

योग्य सवयी ठेवा
या सोप्या उपायांनी दही दीर्घकाळ ताजे आणि चविष्ट राहते

skin care
<strong>येथे क्लिक करा.....</strong>